Download App

अजित पवार ॲक्शन मोडवर, दरडप्रवण भागात तातडीने संरक्षक भिंती बांधण्याचे निर्देश

Mumbai News : मुंबई उपनगरातील (Mumbai News) चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.

आपत्ती निवारणासाठी केंद्रसरकारकडून निधी प्राप्त होताच त्या खर्चाची प्रतिपुर्ती मुंबई महानगरपालिकेला करावी, अशा सूचनाही अजित पवार यांनी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिल्या आहेत.

मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप व अन्य ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्तींच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाय-योजनांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

Shiv Chhatrapati Award : ‘त्या’ सात खेळांचा ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्कारात पुन्हा समावेश

यावेळी अजित पवार यांनी मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा धोकादायक ठिकाणी दुर्घटना घडू नये, जिवीत व वित्तहानी होऊ नये, यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने या भागात संरक्षकभिंती बांधण्यासह इतर आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.

पुण्यात FTII मध्ये झळकलं वादग्रस्त बॅनर, हिंदुत्ववादी संघटना अन् विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा

मुंबई उपनगरातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्व्हेक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयआयटी-मुंबई मार्फत केले असून त्याची यादी तयार करण्यात आली आहे. अशा संभाव्य धोकादायक भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. आपत्ती निवारणासाठी केंद्रसरकारकडून निधी मिळताच मुंबई महानगरपालिकेला खर्चाची प्रतिपुर्ती करण्यात येईल. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून ही प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना…

follow us