Download App

अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून बेपत्ता.. बदलापूर प्रकरणात नवीन ट्विस्ट

Akshay Shinde Encouter Case Parents Missing : बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. या प्रकरणातील आरोपी म्हणून अक्षय शिंदे यांचं कथित एन्काऊंटर झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अक्षयचे (Akshay Shinde) पालक मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर (Badlapur Case) आलंय. ते वकिलांच्या देखील संपर्कात नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

न्यायालयाने बदलापूर अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशानंतर अचानक अक्षय शिंदे याचे पालक संपर्काबाहेर गेले आहेत. इतकंच नाही, तर त्यांचे घर देखील कुलूपबंद आढळल्याची माहिती समोर आलीय. अक्षय शिंदे याचे पालक अंबरनाथमध्ये मावशीकडे वास्तव्यास होते. परंतु ते तिथूनही निघून गेल्याचं उघड झालंय.

गाड्या उडवल्या… 9 जणांना चिरडले, मद्यधुंद चालकाचा ‘कार’नामा; जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यासाठी त्याच्या पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. परंतु त्यानंतर अक्षयच्या वडिलांनी न्यायालयात सांगितलं की, त्यांना केस लढण्याची इच्था नाही. त्यानंतर आता ते त्यांच्या वकिलांच्या देखील संपर्कात नसल्याचं समोर येतंय. अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून कुठे आहेत? नेमके कुठे गेलेत? कसे आहेत, यासंदर्भात कोणाला काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय.

“घाबरू नका, इनकम टॅक्सवाले येणार नाहीत”, PM मोदींनी सांगताच पुढं काय घडलं?

दरम्यान अक्षय शिंदे प्रकरणात आणखी एक मोठं अपडेट समोर आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. अक्षयचं एन्काऊंटर झाल्यावर त्याच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या मुलाचं एन्काऊंटवर नसून नियोजनबद्ध कट होता, असा दावा त्यांनी याचिकेत केला होता. दरम्यान आता या एन्काऊंटरमध्ये समावेश असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत.

 

follow us