Download App

602 चा अजितदादांना धसका, आपल्याला ते ऑफिस नकोच; उपमुख्यमंत्री अंधश्रद्धेचे बळी?

Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर अद्यापही मंत्र्यांचे खाते वाटप झाले नाही. पण बिनखात्याचे मंत्री कामाला लागले आहेत. आता मंत्र्यांसाठी कार्यालय आणि बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. अशात मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या कार्यालयाचा किस्सा समोर आला आहे. पुरोगामी विचाराच्या पक्षात घडलेले आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा यांनी हे कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे अंधश्रद्धा.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर असलेलं कार्यालय घेण्यास नकार दिला आहे. या गोष्टीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाच्या खोलीत कार्यालय बनवायचे नाही. त्यांनी सहाव्या मजल्यावरील दुसऱ्या एका खास खोलीत आपले कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

खोली क्रमांक 602 बद्दल अंधश्रद्धा
602 क्रमांकाची खोली अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरच आहे. ही खोली 3000 हजार स्क्वेअर फूट इतकी आहे आणि केबिनही खूप मोठी आहे. यात एक कॉन्फरन्स रुम आहे आणि ऑफिस केबिनसाठीही पुरेशी जागा आहे. याशिवाय मुख्यमंत्र्याचे कार्यालय मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आहे, त्यामुळे हा मजला सत्ता केंद्र मानला जातो.

भुजबळांना सिध्दगड, वळसेंना सुवर्णगड; मंत्र्यांना बंगले वाटप, कोणाला कोणता बंगला मिळाला?

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील ही खोली अजित पवारांना मिळणार होती मात्र त्यांनी नकार दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या खोलीबद्दल काही अंधश्रद्धा राजकीय वर्तुळात पसरलेल्या आहेत आणि त्यामुळेच अजित पवारांनी या खोलीत कार्यालय थाटण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आले.

मुख्य सचिवांची अजितदादांसाठी कुर्बानी
अजित पवारांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले असून त्यांना 602 क्रमांकाच्या खोलीऐवजी आता मुख्य सचिवांसाठी असलेल्या त्याच मजल्यावरच्या 502 क्रमांकाच्या छोट्या केबिनमध्ये जाणार आहे. या मजल्यावर मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांचीही केबिन आहे.

अखेर शिवतारेंनी अजितदादांशी जुळवून घेतलं! तोंडभरुन कौतुक करत म्हणाले, ते तर माझे आवडीचे नेते…

मंत्र्यांना खोली क्रमांक 602 चा धसका?
अजित पवारांनी या खोलीत कार्यालय करण्यात नकार दिल्याने 602 ची नेमकी कथा आणि इतिहास काय? अजित पवार तिथे बसण्यास का घाबरले, याची एक कथा आहे. 2014 मध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कृषी, महसूल आणि अल्पसंख्याक व्यवहार खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचं कार्यालय या 602 च्या कक्षात होते. पक्ष आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांना हे विशेष केबिन देण्यात आले होते. मात्र दोनच वर्षांनंतरच भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याला जमीन घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अजित पवारांनी 3 महिन्यांपूर्वीच बोलावली होती ‘गुप्त बैठक’… इथूनच सुरु झाली राष्ट्रवादीच्या फुटीची गोष्ट

भाजप नेते पांडुरंग फुंडकर कृषीमंत्री असताना त्यांना ही खोली देण्यात आली होती. मे 2018 मध्ये हृदयाविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याच वर्षी अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कार्यभार आला आणि त्यांनाही त्याच खोलीचे वाटप करण्यात आले. मात्र पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

अजित पवार काय म्हणाले
602 क्रमांकाची खोली सोडून दुसरी छोटी खोली घेण्याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की नवीन खोली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ आहे. तेथे राहणे चांगले जेणेकरुन संवाद सुरळीत चालेल.

Tags

follow us