Download App

किरीट सोमय्या नाराज ? निवडणुकीची जबाबदारी नाकारली, पण पक्षाला ठाकरेंविरोधातील आठवणही करून दिली

Kirit Somaiya : मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.

  • Written By: Last Updated:

Kirit Somaiya refuse to member of bjp Campaign Committee: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडून विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्यावर देण्यात आली आहे. तर निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीचे पत्र प्रसारमाध्यमांकडे आल्यानंतर काहीच तासात किरीट सोमय्या यांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. तसे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे. परंतु ट्वीटमधील मजकुरावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या म्हणतात, प्रिय बावनकुळेजी मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडेपाच वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे. तसेच सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले आहेत. तर तीन वेळा माझावर जीवघेणे हल्ले झाले आहेत. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात बिहार पॅटर्न! अमित शाहांसोबत राजकीय चर्चा पण..,; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं क्लिअर

किरीट सोमय्या हे पक्षाच्या नेत्यांना संपर्क साधून, जबाबदारी नाकारत असल्याचे सांगू शकले असते. परंतु त्यांनी जाहीरपणे ट्वीट केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंविरोधात संघर्ष केलेला आहे. त्यांचे घोटाळा बाहेर काढले आहे. पक्षासाठी लढताना त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत, हे ही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. त्यावरून किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर

किरीट सोमय्या यांना पक्षाकडून कोणतेही मोठे पद देण्यात आलेले नाहीत. खासदार असताना त्यांचे 2019 मध्ये तिकीट कापण्यात आले. त्यानंतर 2024 लाही त्यांना पक्षाने तिकीट दिले नाहीत. त्यामुळे सोमय्या हे पक्षातून साइडलाइनला गेले आहेत.

कुणावर कोणती जबाबदारी ?

विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीत रावसाहेब दानवे यांच्या हाती सूत्र देण्यात आले आहे. ते समितीचे अध्यक्ष आहेत. तर सहसंयोजक दिलीप कांबळे, अशोक नेते, श्रीकांत भारतीय, जाहीरनामा समिती सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क समितीवर चंद्रकात पाटील, समाजिक संपर्क समिती पंकजा मुंडे, महिला संपर्क समिती विजयाताई रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्क समिती राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क समिती रक्षा खडसे, तर प्रचार यंत्रणा समिती रविंद्र चव्हाण, सहकार क्षेत्र समिती प्रविण दरेकर, तसेच अनुसूचित जाती संपर्क समिती विजय गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क समिती विजयकुमार गावित, सोशल मीडिया आय.टी. निरंजन डावखरे, मीडिया अतुल भातकळकर, महायुती निवडणूक अभियान समन्वयक गिरीष महाजन, निवडणूक आयोग संपर्कप्रमुख किरीट सोमय्या, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संपर्क प्रमुख केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं.

किरीट सोमय्या यांनी समितीत काम करण्यास नकार दिल्यानंतर पक्षाने त्यांचे नाव काढून टाकले असून, दुसऱ्याची नियुक्ती केलीय.

follow us