Asim Sarode on Despite Having A Majority Will Thackeray Become The Mayor Instead Of Bjp Shinde In Mumbai : राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरक्षणाच्या गुगलीवर सत्तेची समीकरणे ठरणार आहेत. यामध्ये मुंबईमध्ये एक ट्विस्ट आला आहे त्यामुळे भाजप- शिंदेंचा नाही तर ठाकरेंचा महापौर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले असीम सरोदे?
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे नेहमीच ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. यावेळी देखील त्यांनी पक्षांतर बंदी कायदा आणि मुंबईमध्ये महापौर पदाच्या आलेल्या ट्विस्टवर भाकित केलं आहे. ते म्हणाले की, जर महापौर आरक्षण सोडतीत ही जागा शेडूल्ड ट्राइब (ST) साठी राखीव झाली तर भाजप व शिंदेसेनेकडे ST प्रवर्गातील नगरसेवकच नसल्याने मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा ‘महापौर’ होईल. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणारे नगरसेवक अपात्र कसे ठरतील?
जर महापौर आरक्षण सोडतीत ही जागा शेडूल्ड ट्राइब (ST) साठी राखीव झाली तर भाजप व शिंदेसेनेकडे ST प्रवर्गातील नगरसेवकच नसल्याने मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा 'महापौर' होईल.
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणारे नगरसेवक अपात्र कसे ठरतील?
व्हिडीओ पूर्ण बघा आणि चॅनेल…
— Asim Sarode (@AsimSarode) January 22, 2026
अकोट, हिवरखेड्यानंतर आता अचलपूर नगरपरिषदेत भाजप-MIM एकत्र…
दरम्यान बुधवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. तर आता या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. अशी बातमी समोर आली होती. मात्र यावर आक्षेप घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणाऱ्या असीम सरोदेंनी कोर्टाकडून पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे.
