Download App

Assembly Election: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब

Nawab Malik: निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीनंतर काहीही होईल.

  • Written By: Last Updated:

Mahrashtra Assembly Election:गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. दोन सरकारे आली. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडून चार पक्ष झाले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहेत. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक मोठा दावा केलाय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे संपर्कात आहे, असा दावा मलिक यांनी केलाय. तर निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

बाकी सगळ्यांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचंय ; मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंसह मविआवर बरसले !

नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध झाला. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून मलिक यांनी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. तर त्यांची मुलगी सना खान हिला मलिक अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिक यांनी वेगवेगळे विधान केले आहेत.

Vidhansabha Election : वरळी-वांद्र्यात मदत मिळावी म्हणून भिवंडीवर अन्याय, बंडखोर उमेदवाराचा उद्धव ठाकरेंवर आरोप

निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे आता सांगू शकत नाही. आता काही लोक सांगत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा राज्यात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांची खूप मदत

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी अजितदादा की शरद पवार यांच्याबरोबर राहणार ही भूमिका जाहीर केली नव्हती. अजित पवार यांच्याबरोबर का गेले ? यावर मलिक म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये असतो तर मला अणुशक्तीनगरमधून तिकीट मिळाले नसते. मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतली नाही हे खरे आहे. पण अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली. त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. मला तिकीट दिल्यानंतर टीका होईल, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात, असे मलिक म्हणाले.

Tags

follow us