पुणे : सर्व विरोधकांनी मिळून कसबा आणि चिंचवड पोट निवडणुका बिनविरोध कराव्यात तीच दिवंगत आमदारांना आदरांजली असेल असे मत आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जर निवडणुका झाल्या तर आर पी आय चा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असेल बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर अधिक व्यापक व्हायला लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणावे लागेल. असे देखील ते पुढे म्हणाले.
तर आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत जाऊन लढवणार असून या निवडणूका जिंकण्याचा निर्धार आमचा असेल.
उद्धव ठाकरे यांची ताकद क्षीण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत गेले, मात्र त्याला शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे असतांना शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली होती आणि महायुती उदय झाला होता. विरोधकांकडून दिशाभूल सुरू आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नाही. असे देखील यावेळी आठवले म्हणाले
खरी भीमशक्ती नरेंद्र मोदींसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित ची युती म्हणता येईल. तिला शिवशक्ती भीमशक्ती म्हणता येणार नाही.
भाजपने रिपब्लिकन पक्षाला डावलू नये. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. एकनाथ शिंदे आता त्यांच्यासोबत गेले तरी त्यांचे नाव घेतात. परंतु रिपब्लिकन पक्ष आधीपासून त्यांच्यासोबत आहे.आमच्या सहभागामुळे महायुती तयार झाली होती, त्यामुळे त्यांनी आमचे नाव घेतले पाहिजे.
बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवला तर त्याला मी काय करू त्या चित्रपटातील गाण्यात भगव्या रंगाला बेशरम रंग म्हटले होते. परंतु सेन्सॉर ने तो रंग हटवला आहे, त्यामुळे आता विरोधाचे कारण नाही.
राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी जावं असे विरोधकांना वाटते. आम्हाला तसे वाटत नाही. राज्यपाल पद सोडण्याची इच्छा त्यांनी स्वतःहून व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्याबाबत निर्णय घेतील.