Download App

बदलापूर स्थानकावरील आंदोलन व्यवस्थित नियोजन करुनच; पोलिसांनी टिपलेल्या गोष्टींनी संशय बळावला

बदलापूर स्थानकावरील आंदोलन व्यवस्थित नियोजन करूनच केलं असल्याचा संशय पोलिसांकडून बळावण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी टिपलेल्या गोष्टींवरुन हा दावा करण्यात येत आहे.

Badlapur sexual abuse case : बदलापूर घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. बदलापुरमधील एका नामंकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (Badlapur Rape Case) शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन घेण्यास दिरंगाई करण्यात आल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या घटनेविरोधात काल 20 ऑगस्टला बदलापूर रेल्वे स्थानकावर बदलापुरकरांनी चक्काजाम आंदोलन केलं. हे आंदोलन व्यवस्थित नियोजन करुनच करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून बळावण्यात आलायं. या आंदोलनादरम्यान, काही गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्याने हा दावा केला जात आहे.

अत्याचाराच्या घटनेप्रकरणी निषेध करण्यासाठी आंदोलकांनी सुरुवातीला शाळेसमोर निदर्शने केली. यावेळी संतप्त जमावाकडून शाळेतील मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर जमावाचा मोर्चा थेट रेल्वे स्थानकाकडे वळाला. रेल्वे स्थानकावर तब्बल 11 तास आंदोलकांनी आंदोलन केलं. काही केल्या जमाव हटत नव्हता. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला, मंत्री गिरीश महाजनांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलक मागणीवर ठाम होते. अखेर जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर जमाव पांगल्याचं दिसून आलं.

Ground Zero : धंगेकरांच्या आमदारकीवर अरविंद शिंदेंचा डोळा; भाजपमध्येही तिघांची तयारी

या आंदोलनासाठी आंदोलकांनी छापलेले बॅनर, व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजेवरुन हे आंदोलन नियोजित असल्याचं दिसून येत आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन सोमवारी करण्याचे नियोजन होते मात्र, रक्षाबंधनमुळे ते मंगळवारी करण्यात आले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आंदोलक निदर्शने करीत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात घोषणाबाजी करीत होते. एवढंच नाही तर या योजनेविरोधात बॅनरवरही छापण्यात आले होते. एका रात्रीत हे बॅनर लावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन; 117 वर्ष 168 दिवसांनी घेतला अखेरचा श्वास

बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 26 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आंदोलकांबद्ल भूमिका घेण्यात येणार असल्याचं रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी स्पष्ट केलंय. तर या आंदोलनासाठी अनेक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते, तर निषेधात सहभागी होण्याचे आवाहन करणारे मेसेज व्हायरल करण्यात येत होते. त्यानंतरच मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकावर लोक जमा होऊ लागले असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

सकाळी 10 च्या सुमारास लोकल गाड्या थांबवण्यात आल्या होत्या, तर 11 च्या सुमारास शाळेबाहेर मोठा जमाव जमा झाला आणि अनेक आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. सायंकाळी 6.10 वाजता पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जमाव पांगवण्यात आला. शाळेबाहेर आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या घटनांबद्दल दोन दंगलीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जवळपास 12 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असल्याचं ठाण्याचे सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.

follow us