बदलापूर प्रकरणात पोलिसांना यश, शाळेच्या फरार ट्रस्टींना अटक
Badlapur School Case : बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला अटक केली होती तर शाळेच्या ट्रस्टी तुषार आपटे (Tushar Apte) आणि उदय कोतवाल (Uday Kotwal) फरार झाले होते. आता पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले आहे.
माहितीनुसार कर्जत परिसरातून क्राईम ब्रँचने दोन्ही ट्रस्टींना अटक केली आहे. या दोघांनाही गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे तुषार आपटे आणि उदय कोतवाल अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने दोघांना अटकपूर्व जामीन देण्यास नाकार दिला होता. अटकपूर्व जामीना मंजूर झाला नसल्याने दोन्ही आरोपी फरार झाले होते मात्र आज कर्जत परिसरातून क्राईम ब्रँचने दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मोठी बातमी! इस्रायला पुन्हा धक्का, हिजबुल्लाहने कॅप्टनसह 8 सैनिकांना केले ठार
तर दुसरीकडे या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत होते. मात्र मुंब्रा बायपास येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडले तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
पूजा खेडकर पुन्हा चर्चेत, आता ‘त्या’ प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली तक्रार