मोठी बातमी! बदलापूर शाळेच्या ट्रस्टींना दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

Farmer End His Life Daughter Wrote Letter To Cm Eknath Shinde (2)

Badlapur Rape Case : बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur Rape Case) झाल्याप्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलायं. अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांवर गुन्हा दाखल आहे, या प्रकरणी विश्वस्तांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.

संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न; आयुष्यमान खुरानाने मांडलं मत

बदलापुरातील एका नामंकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आक्रोश करीत आरोपीला तत्काळा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आंदोलकांच्या मनधरण्या केल्या मात्र, सायंकाळच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं होतं. पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगवलं तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसून आलं होतं.

संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न; आयुष्यमान खुरानाने मांडलं मत

बदलापुरमधील नामंकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. अक्षय शिंदे याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन आरोपीचा तळोजा कारागृहामधून ताबा घेतला होता. पोलिस व्हॅनमध्ये अक्षयला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावत पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. यावेळी स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या चकमकीत अक्षय ठार झालायं.

धक्कादायक! ‘शर्मा नव्हे सिद्दीकी’, कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड

follow us