Siddhivinayak Temple : लालबागचा राजाची ओळख संपूर्ण देशभर नवसाला पावणारा गणपती म्हूणन आहेत. सामान्य भाविक भक्त ते सेलिब्रेट, राजकीय, उद्योगपती गणेशउत्सव काळात बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावत असतात. तर दररोज देशभरातून दादर मधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील (Siddhivinayak Temple) गणपती बापाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात.
मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.मात्र आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 16 डिसेंबरपर्यंत मंदिरातील लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार नाही.
पाच दिवस बापाच दर्शन नाही
मुंबईतील प्रसिद्ध गणपती अशी सिद्धिविनायक मंदिर आजपासून पुढील पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने दिली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन आणि विधी करण्याचे काम आजपासून पुढील पाच दिवस होणार आहे. माघी गणेशोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या धर्तीवर लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. या कारणामुळं भाविकांना पुढील पाच दिवस म्हणजे बुधवारपासून (11 डिसेंबर) ते 16 डिसेंबरपर्यंत दर्शन घेता येणार नाही, याबाबत मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दर्शनासाठी पर्यायी व्यवस्था…
बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब मुंबईकर रांगा लावतात. पण आता पुढील पाच दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. त्यामुळं मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. मूळ मूर्तीच्या समोरच सिद्धिविनायक लाडक्या बाप्पाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून, त्या प्रतिकृतीचे दर्शन पुढील पाच दिवस भाविक घेऊ शकतील अशी पर्यायी व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
दीड लाखांचा डिस्काउंट अन् 461 किमीची रेंज ; ‘या’ MG इलेक्ट्रिक कारवर जबरदस्त ऑफर
माघी गणेशोत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्याच्यात तयारीसाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून, या धर्तीवर लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.महायुती सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी पार पडल्या त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सकाळी सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतल्या नंतर शपथ घेतली होती.