Download App

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा! प्रकल्पाची मुलभूत माहिती मिळणं झालं सोपं…

मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महारेरा आता नवीन नोंदणीकृत प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड देणार आहे. या क्यूआर कोडवर स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाची मूलभूत माहिती उपलब्ध होणार आहे.

तीन महिन्यात काबूल दोनदा हादरले; बॉम्ब स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासोबत क्यूआर कोडही मिळणार आहे. या क्यूआर कोडमुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित सर्व महत्त्वाची प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

NCERT बोर्डचा अभ्यासक्रम होणार नवीन शैक्षणिक धोरणानुसार; केंद्रीय शिक्षण खात्याची माहिती

नुकतेच पुण्यातील एका विकासकाला क्यूआर कोडसह नवीन नोंदणीचे प्रमाणपत्र महारेराने जारी केले आहे. महारेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकाने कुठल्या-कुठल्या बाबींची काळजी घ्यायची, याचा उल्लेख या नोंदणी प्रमाणपत्रात दिलेला आहे.

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदवल्या, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का? प्रकल्पाच्या नोंदणीचे नुतनीकरण केले का?, याबाबतची माहिती क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.

एका फुगे विक्रेत्याने 2.1 अब्ज रुपयांची कंपनी बनवली, भारतीय कंपनीचा आंतरराष्ट्रीय प्रभाव कायम

याशिवाय महारेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकांना दर 3 महिन्याला आणि 6 महिन्याला काही प्राथमिक माहिती विविध प्रपत्रांमध्ये त्यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागणार आहे. यातील प्रपत्र 5 अत्यंत महत्त्वाचे प्रपत्र आहे.

दरम्यान, हे दरवर्षी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात. हे सर्व या क्यूआर कोडमुळे येथून पुढे घर बसल्या सहजपणे पाहता येणार आहेत. भविष्यात सध्या नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकल्पांना टप्प्या-टप्प्याने ही सुविधा लागू केली जाणार आहे.

Tags

follow us