मुंबई : लोकसभेसाठी काही मतदारसंघात उमेदवारीबाबत महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील जागांचा समावेश होता. त्यापैकी कल्याणची जागा एकनाथ शिंदेंच्या (Ekntah Shinde) शिवसेनेला देण्यात आली असून, त्यानंतर आता ठाण्याच्या जागेवरचा दावा भाजपनं सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळ कल्याण पाठोपाठ आता शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेली ठाण्यातूनही शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधकृत घोषणा होण्याचीदेखील शक्यता आहे. (Eknath Shinde Maybe Get Thane Seat For Loksabha Election)
UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चे निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात टॉपर; अनिमेष प्रधान द्वितीय
गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण आणि ठाणे या दोन लोकसभेच्या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चांच्या फैऱ्या होत होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी कल्याणमधून एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिल्याची घोषणा केली होती. पण ठाण्याच्या जागेवरून काही दावा सोडला नव्हता. मात्र, आता या जागेवरूनही भाजपनं दावा सोडल्याचे सांगितले जात आहे. ठाणे मतदारसंघातून दणदणीत विजयाची शिंदेंनी नेतृत्त्वाला हमी दिल्याचेही सांगितले जात आहे.
बारामतीत नवा ट्विस्ट; रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज…
या जागेसाठी भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते ठाण्याच जागा भाजपलाच मिळावी यासाठी आग्रही होते. यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्रदेखील पार पडले होते. परंतु, तोडगा काढण्यात यश आले नव्हते. मात्र, आता भाजपनं मोठ्या मनानं या ठिकाणचा दावा शोडत ही जागा शिंदेंना सोडणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी
…म्हणून भाजपचा ठाण्यावर दावा होता
आतापर्यंत ठाण्याच्या जागेवर भाजपकडून दावा केला जा होता. कारण राम कापसेंपासून अनेकांनी या ठिकाणाहून निवडणुका लढलेल्या आहेत. त्यात सध्याचे जे सिटिंग खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ही जागा एकनाथ शिंदेंना न जाता भाजपला मिळावी असा युक्तीवाद भापकडून जागावाटपावेळी वेळोवेळी केला जात होता. मात्र, आता या जागेवरून भाजपनं दावा सोडला असून, लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता शिंदे राजन विचारेंना टफ देण्यासाठी ठाण्यातून कुणाला मैदानात उतरवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.