बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार

Nitesh Rane On Udhdhav Thackeray :  भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले की, छत्रपती […]

Letsupp Image   2023 07 25T140518.208

Letsupp Image 2023 07 25T140518.208

Nitesh Rane On Udhdhav Thackeray :  भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

राणे म्हणाले की, छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंब प्रमुख आहे. अडीच वर्षे गळ्याला पट्टा लावून घरात बसून स्वतःच्या कुटुंबाचे खिसे भरले त्याला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणू नये, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, अण्णा हजारेंना मशाल हाती घ्यायला सांगणे ही उबाठा गटावर आलेली वाईट वेळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी असे म्हटले होते,  आणि आता तेच लोक अण्णा हजारेंना आंदोलन करायला सांगत आहे. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करावं, सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीत बसलाय, असे राणे म्हणाले.

शिंदेंचं मुख्यमंत्रिपद म्हणजे मावळणारा सुर्य, हे फडणवीसांनाही माहितीय; राऊतांचा टोला

तसेच  26 जुलै च्या महापुरात बाळासाहेबांना एकट टाकून उद्धव ठाकरे फॅमिली सोबत ताज हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी मला हॉटलेच्या लॉबीमध्ये रश्मी ठाकरे भेटल्या होत्या. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतऐवजी राणेंकडून मुलाखत घेऊन दाखवावी तर कळेल आवाज कुणाचा, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना इशारा दिला.

ईस्ट इंडिया कंपनी ते इंडियन मुजाहिद्दीन : विरोधकांच्या ‘INDIA’वर PM मोदींचा पहिला थेट वार

तसेच बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीत कॅमेरा साफ करत होते. त्यामुळे त्यांनी बाबरी या विषयावर बोलू नये. बाळासाहेब ठाकरे व इतर मातब्बर शिवसैनिकच या विषयावर बोलू शकतात, असे म्हणत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

 

Exit mobile version