शिंदेंचं मुख्यमंत्रिपद म्हणजे मावळणारा सुर्य, हे फडणवीसांनाही माहितीय; राऊतांचा टोला

शिंदेंचं मुख्यमंत्रिपद म्हणजे मावळणारा सुर्य, हे फडणवीसांनाही माहितीय; राऊतांचा टोला

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये बंड करून राष्ट्रवादीचे नते अजित पवार हे भाजपसोबत शिंदे-फडणवाीसांच्या सत्तेत सामील झाले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. त्यामुळे ज्या शिंदे गटाने अजित पवारांमुळे शिवेसेनेत बंड केल्याचं एक कारण सांगितलं होतं. त्यावरून त्यांची कोंडी झाली आहे. अशी स्थिती असताना आता थेट शिंदेंच्या जागी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. त्यावर देवेंद्र फाडणवीसांनी शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सांगितलं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Criticize Devendra Fadanvis on CM Eknath shinde Ajit Pawar )

ईस्ट इंडिया कंपनी ते इंडियन मुजाहिद्दीन : विरोधकांच्या ‘INDIA’वर PM मोदींचा पहिला थेट वार

काय म्हणाले संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस म्हणाले शिंदेच मुख्यमंत्री राहणार. पण ही त्यांच्या मन की बात नाही. ती स्क्रिप्ट दिल्लीवरून आली आहे. पण आणचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार आहेत. हे देवेंद्र फडणवीसांना देखील माहिती आहे. पण राजकारणात उगवत्या सुर्याला नमस्कार केला जातो. त्यामुळे ते असं म्हणता आहेत की, शिंदेच मुख्यमंत्री राहणार.

अमरावती जिल्हा बँकेत ‘एका’ मतासाठी ‘दोन’ कोटी : सत्ता हिरावलेल्या बच्चू कडूंवर यशोमती ठाकूरांचे आरोप

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या मनात कोणताही संभ्रम नसून महायुतीतल्या नेत्यांच्या मनात संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आमच्यात कसलाही संभ्रम नाही. अनेक राजकीय नेते भविष्य सांगत आहेत, परंतु त्यांचं काही खरं नाही. मी अधिकृतपणे सांगतो की, येत्या 9, 10, 11 तारखेला काहीही होणार नाही, झालंच तर आमचा विस्तार होणार आहे, त्यामुळे आता समझदार को इशारा काफी है, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच प्रत्येकाने बोलतांना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं आहे. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार हे तिन्ही नेत्यांना पक्कं माहिती आहे. त्यामुळे वावड्या उठवणं बंद करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube