ईस्ट इंडिया कंपनी ते इंडियन मुजाहिद्दीन : विरोधकांच्या ‘INDIA’वर PM मोदींचा पहिला थेट वार

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 25T123326.528

PM Modi attack On Oppostion Alliance :  संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी विरोधकांच्या INDIA या नवीन नावाची खिल्ली उडवली आणि सांगितले की, ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिदीनमध्येही एक इंडिया आहे, मात्र केवळ इंडिया नाव देऊन इंडिया बनत नाही. विरोधी पक्ष पूर्णपणे दिशाहीन असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

https://letsupp.com/national/geetika-sharma-sucide-gopal-kanda-hariyana-71672.html

पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष हताश आणि निराश आहे. त्यांच्या वागण्यावरून असे दिसून येते की, त्यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात राहण्याचे ठरवले आहे. ईस्ट इंडिया कंपनी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या नावांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने भाजप २०२४ च्या निवडणुकीतही सत्तेवर येईल, असा विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पुढील काळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही ते म्हणाले.

Bihar Politics : नितीश कुमारांच्या JDU त मोठा भूकंप; भाजपने अर्धा डझन नेते फोडले

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे. 2024 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत येत आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ईस्ट इंडिया कंपनी यांची स्थापना परदेशी नागरिकांनी केली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आज लोक इंडियन मुजाहिदीन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अशी नावे वापरतात पण हे चेहरे एक गोष्ट दाखवतात आणि सत्य काही वेगळेच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube