Ram Shinde : कर्जत एमआयडीसीच्या संदर्भात मला म्हणतात की तुमचं गुऱ्हाळ सुद्धा नाही. राम शिंदे (Ram Shinde) गुऱ्हाळ सुद्धा काढू शकला नाही. त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. चुलता चार वेळा मुख्यमंत्री नव्हता. त्यांच्या आजोबांनी सुद्धा एकही कारखाना काढल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे माझी ही सुरुवात आहे. आता राजकारणात माझी सुरुवात झाली आहे. आमदार झालो, मंत्री झालो पण माझा नातू नक्कीच कारखानेच कारखाने काढील. त्यामुळे दुसऱ्याला बोलण्याची आवश्यकता नाही. स्वतःचं कतृत्व शून्य. सगळं काकांच्या, आजोबांच्या मेहेरबानीवर झालं आहे. मी गुऱ्हाळ काढलं नाही पण माझा नातू नक्की काढील, अशा शब्दांत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला.
राम शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. खरंतर मी मंत्री असतानाच कर्जत एमआयडीसीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. 2019 ला माझा पराभव झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. पण, त्यांच्या मनात पाप आहे. नीरव मोदीची जागा या एमआयडीसीत घेण्यासाठी हा अट्टाहास आणि आटापिटा सुरू आहे, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
अजितदादांनी माझ्या पत्रावर निधी दिला
माझा हिशोब काहीच बाकी नाही. तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिस्सेदार कोण आहे? अख्ख्या कर्जत तालुक्यात माझी कुठेच जमीन नाही. माझ्या पत्रावर अजितदादांनी कर्जतसाठी 45 कोटींची तरतूद केली आणि ते अजितदादांचे आभार मानतात. हे जी दुटप्पी भूमिका आहे ते लोकांनी आता ओळखलं आहे. मी अजितदादांना स्पष्टच विचारलं की दादा तुम्ही कुणाच्या पत्रावर निधी दिला तर अजितदादाही म्हणाले तुझ्याच पत्रावर निधी दिला. तुम्हीच तिथले आमदार आहात. विरोधी पक्षाच्या आमदाराच्या पत्रावर निधी देण्याची तरतूदच नाही आपल्याकडे, असे शिंदे म्हणाले.
Rohit Pawar : ‘सुनावणी संपण्याधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
फुगड्या खेळणे, फुलं उधळणे असा संघर्ष असतो का ?
सरकारला युवकांचं देणंघेणं नाही म्हणता मग यांना घेणंदेणं आहे का. यांनी काय केलं युवकांसाठी. संघर्ष असा असतो का, स्वतःच्या अंगावर फुलं उधळून घेणे, डीजेपुढे नाचणे, फुगडी खेळणे, विहिरीत उड्या मारणे, तलावात उड्या मारणे हा कोणता संघर्ष आणला आहे असा संघर्ष कधी नसतो. त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत आहेत.