महिलेला गंडा घातल्याप्रकरणी भोंदूबाबा अटकेत : शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचा दावा

मुंबई : एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली आहे. ​​ऋषी पांडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. ​मुंबईमधील चारकोप परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पांडे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे. (Borivali Police has arrested a con man for cheating a woman.) मिळालेल्या माहितीनुसार, […]

Sharad Pawar

Sharad Pawar

मुंबई : एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली आहे. ​​ऋषी पांडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. ​मुंबईमधील चारकोप परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पांडे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पदाधिकारी असल्याचे सांगत आहे. (Borivali Police has arrested a con man for cheating a woman.)

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी पांडे याने बोरिवली पोलीस ठाण्यात स्वत:ची गुरुजी असल्याची ओळख करुन देत पोलिसांशी संपर्क वाढवला. त्यानंतर महिलेला मदत करण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले. हा प्रकार लक्षात येताच महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पांडेविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

विनायक मेटेंचे घर अन् संघटना फुटली : भाऊ, बहिण अन् भाच्याची वेगळी चूल; ज्योती मेटे एकाकी!

पांडेने फसवणूक करून किती लाख रुपयांचा गंडा घातला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. या भोंदू बाबाने यापूर्वीही अनेकांची फसवणूक केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जरांगे पाटील ‘अंतरवालीतून’ निघाले, पण ‘मुंबईत’ पोहचणारच नाहीत! शिंदे सरकारचा प्लॅन रेडी

दरम्यान, आरोपी ऋषी पांडेने मथुरा, गुजरात, सोमनाथ, उज्जैन अशा अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. आता तो अयोध्येला जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Exit mobile version