Download App

फासावर लटकवलं तरी महाराष्ट्राला झुकू देणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray : लोअर परळ (Lower Parel) येथील डिलाईल रोडच्या उद्घाटनवरुन माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरेंनी थेट शिंदे सरकारला (Eknath Shinde) इशारा दिला आहे. मला फासावर लटकवणार असतील तरी मी मुंबईला लुटू देणार नाही आणि महाराष्ट्राला झुकू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, 50 खोके देऊन तुम्ही आमचे सरकार पाडलंय. मंत्रालय हडप केले तिथे बसून कामे तरी करा. मुंबईकरांसाठी लढताना गुन्हा होत असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनाही अभिमान झाला असता, आई वडिलांनाही अभिमान आहे कारण त्यांचा मुलगा मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढतोय. श्रेयवादासाठी सगळे सुरु आहे.

जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर

नवी मुंबईची मेट्रो 5 महिने पूर्ण होऊनही उद्घाटनासाठी रखडली होती. वरळीतील लोअर परेळ ब्रीजही उद्घाटनासाठी सुरु झाला नव्हता. मी तिथला स्थानिक प्रतिनिधी आहे, मला कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे. तिथल्या जनतेला त्रास होतोय, मुख्यमंत्र्यांना या कामासाठी वेळ नाही. जनतेसाठी मी गुन्हा घ्यायला तयार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“सहा जाती वगळून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करा; OBC नेत्याची मोठी मागणी

घटनाबाह्य मुख्यमंत्री इतर राज्यात प्रचाराला फिरतात, राज्यातील जनतेच्या कामासाठी त्यांना वेळ नाही. डिलाईल रोडच्या पूलावरील एका लेनचं उद्घाटन गणेशोत्सवात झाले, त्यानंतर दुसरी लेन तशीच ठेवली होती. या पूलाच्या उद्घाटनाला होणाऱ्या दिरंगाईमुळे तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. परवा रात्री आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्ही रस्ता खुला झाल्याचे सांगितले. 10-15 दिवसांपासून दुसरी लेन पूर्ण झाली होती. केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नाही म्हणून महापालिका थांबली होती असा आरोप त्यांनी केला.

Tags

follow us