Download App

Sameer Wankhede : 18 कोटींवर डील ठरली, 50 लाखांचं टोकन; सीबीआयचे वानखेडेंवर गंभीर आरोप

CBIs serious charges on Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे (Drug mafia) कर्दनकाळ म्हणून ओळखले जात. त्यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराचा (Corruption) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावे आहेत. समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने एक दिवस आधी छापा टाकला होता.

त्यानंतर आता या प्रकरणात एनसीबी माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बनावट असून पैशांसाठी ठरवून करण्यात आल्याचं यामध्ये म्हटलं आहे. तर वानखेडेंनी याच क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरूख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती. वानखेडेंनी 25 कोटींची मागणी केली पण नंतर 18 कोटींमध्ये ही डील ठरली. त्यातील 50 लाख रूपये वानखेडेंनी आगाऊ घेतल्याचा आरोप यात करण्यात आलाय.

Don 3: डॉन-3 येणार चाहत्यांच्या भेटीला; सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…

दरम्यान सीबीआयच्या कारवाईनंतर रविवारी समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांहून अधिक काळ झडती घेतली. छाप्यादरम्यान सीबीआयकडून 18,000 रुपये आणि मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. मी सेवेत येण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. मी आहे. देशभक्त असल्याची शिक्षा दिली जात आहे.”, असं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला आणि काहीही सापडले नाही. सीबीआयच्या आणखी सात अधिकाऱ्यांच्या पथकाने माझ्या सासरच्या घरी देखील छापेमारी केली.

Tags

follow us