सत्ता गेल्याने तो वेडा झालाय; उद्धव ठाकरेंवर बोलताना राणेंचा संयम सुटला !

Narayan Rane on Uddhav Thackeray मुंबईः केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करतात.आजही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हा वेडा झाला आहे, अशी एकेरी भाषा राणे यांनी वापरली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, भाजपची सत्ता देशात आल्यानंतर […]

सत्ता गेल्याने तो वेडा झालाय; उद्धव ठाकरेंवर बोलताना राणेंचा संयम सुटला !

Narayan Rane

Narayan Rane on Uddhav Thackeray मुंबईः केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करतात.आजही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हा वेडा झाला आहे, अशी एकेरी भाषा राणे यांनी वापरली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, भाजपची सत्ता देशात आल्यानंतर 2014 नंतर राम मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. आता दहा जानेवारीला कामही पूर्ण होत आहे.राम मंदिर कोणी बांधले हे उद्धव ठाकरे सोडून सगळ्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरेला चांगले दिसत नाही.ते चांगले बोलत नाही.सत्ता गेल्याने ते वेडे झाले आहे. रामलल्ला भाजपची प्रॉपर्टी आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काल उपस्थित केला होता.त्यालाही राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

‘…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही’; आंबेडकरांचा टोला…

राणे म्हणाले, त्याला काय अक्कल आहे. राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही. राम हा देव आहे. ती सगळ्यांची प्रॉपर्टी आहे. मंदिर हे भाजपने बांधले आहे हे जनतेला माहीत आहे. जनता ठरवेल त्याचे श्रेय कुणाला द्यायचे आहे. उद्धव ठाकरे रडीचा गेम खेळत असल्याची टीकाही राणे यांनी केली आहे. येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेचा एखादा-दुसराही खासदारही निवडून येणार नाही. आम्ही त्याचे खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.


‘शरद पवार उद्धव ठाकरेंना कंटाळून सोडणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला


पैसे दिलेले सर्व्हे आम्ही मानत नाही : राणे

सी वोटरच्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक 28-29 जागा मिळतील. तर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला 19-21 जागा मिळतील असा सर्व्हे आहे. या सर्व्हेवर बोलताना राणे म्हणाले, आमच्या लोकसभेच्या शंभर टक्के जागा येणार आहे. पैसे देऊन केलेला सर्व्हे आम्ही मानत नाही.

Exit mobile version