मुंबई : आज अधिवेशनाच्या (Budget Session) चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात अजितदादा (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना जोरदार चिमटे काढले. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बॅनर लागत आहेत. यावरूनही शिंदे म्हणाले, एकदा ते ठरवा, कोण होईल नेमकं.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागला होता.
हे देखील वाचा
Eknath Shinde: अजितदादांना सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही!
एकनाथ शिंदे म्हणाले, जयंतराव तुम्ही अजितदादा आणखी कोणी-कोणी भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावलेत. अजितदादांच म्हणाले त्याची साईज सेम आहे. ते कोण लावतंय बघा जरा आणि एकदा काय ते ठरवा. भावी मुख्यमंत्री म्हणून कोणाचे तरी नाव फिक्स करा, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना लागवला.
अजित दादांनी वर्षा बंगल्यावरील चहापानाचा खर्च काढला. तुम्ही म्हणाले की सोन्याचं पाणी आहे का? दादा सोन्याचं पाणी नाही पण सोन्यासारखी माणसं माझ्याकडे येतता. त्यांना चहा पाजायला नको का? अडीच वर्षात कोविड होता. त्यामुळं कोण तिकडे जात नव्हतं. ऑनलाइन मिटींगला फेसबुकवरून लाईव्ह करून देखील चहापानाचा खर्च झालाय, असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.