Eknath Shinde: अजितदादांना सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही!

Eknath Shinde: अजितदादांना सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही!

मुंबई : ‘अजितदादा तर आता शिवसेनेचे असे प्रवक्ते झालेत फक्त पद द्यायचं बाकी आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना काढल्यानंतर सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हळूच म्हणाले, ‘त्यांना सहशिवसेना प्रमुखपद दिलं पाहिजे’

यावर मुख्यमंत्री म्हणाले,’सहशिवसेना प्रमुखपद देता यायचं नाही, शिवसेना तर आमच्याकडे आहे. दादा तुमची ती संधी गेली. प्रवक्ते वगैरे ठिकय पण कडवट शिवसैनिक होऊ नका. दुसऱ्यांना पण जागा शिल्लक राहूद्या, असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लागवला.

‘जयंत पटलांवर अन्याय करुन तुम्ही विरोधी पक्षनेते झालात. विरोधी पक्षनेता होण्याची जयंत पटलांची (Jayant Patil) इच्छा होती’, असा मिश्किल टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना लागवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

बारावीचा गणिताचाही पेपर फुटला: आर्धा तास आधीच पेपर व्हायरल

‘देशद्रोही म्हणालो नाही पण तुम्ही आम्हाला महाराष्ट्रद्रोही करुन टाकलं. महाराष्ट्रद्रोह आम्ही काय केला? घटनाबाह्य सरकार म्हणता मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?’ असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube