Download App

मृत्यूंचे तांडव झालेल्या हॉस्पिटलवरच रुग्णांचा भरोसा; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच सांगितली

  • Written By: Last Updated:

मुंबईः ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंचे तांडव सुरू आहे. गेल्या चार दिवसांत या हॉस्पिटलमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात ही घटना घडल्याने विरोधकांनी त्यांना घेरले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच महानगरपालिका आयुक्त, डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या हॉस्पिटलची क्षमता पाचशे बेडची आहे. परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण येथे उपचार घेत आहेत. जागा पुरत नसल्याने लॉबीमध्ये बेड टाकून रुग्णावर उपचार केले जात आहेत. येथे आलेल्या रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले जात नाही. रुग्णांच्या या हॉस्पिटलवर विश्वास आहे. येथे रुग्ण जास्त येत असल्याने सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या सुविधांवरही लोड येत असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.


पवारांच्या लेकीची खासदारकी जाणार? बारामतीच्या किल्ल्यावर मित्रपक्षानेच ठोकला दावा

दुर्घटना झाल्यानंतरही 91 रुग्ण या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. तर बावीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दुर्घटना झाल्यानंतर रुग्णांना डॉक्टर व नर्सेसवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य कमी होता कामा नये. रुग्ण उपचार घेऊन व्यवस्थित घरी जावा असे त्यांना वाटते. त्यामुळे ते जीव लावून काम करतात, अशी पाठराखणच मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दुर्घटनेचा चौकशीचा अहवाल कधी देणार ?
या हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या प्रकरणाचा चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच केली होती. या समितीत महापालिका आयुक्त, सिव्हिल सर्जन, आरोग्य संचालक, आयुक्त यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. ही समिती सखोल चौकशी करून 25 ऑगस्टला अहवाल सादर करतील, असे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधक आक्रमक

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तर काँग्रेस, ठाकरे गटानेही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर आरोप केले होते. या घटनेवरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांनी केलेली आहे. सोमवारीही आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याने विरोधक आणखी आक्रमक झालेले आहेत.

Tags

follow us