पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा

  • Written By: Published:
पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा

Bachchu Kadu on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार व अजित पवार हे एकमेंकांना भेटत आहेत. त्यावरून काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार ( Sharad Pawar) संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यावर आता अपक्ष आमदार व शिंदे गटाबरोबर असलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पवारांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याचे विधान केले आहे. तर शरद पवारांबाबत बच्चू कडू यांनी पवारांचे बोलणं एक आणि कृती वेगळी असे सांगत एक मोठे विधान केले आहे.

शरद पवारांचे बोलणे आणि त्यांची प्रत्यक्ष कृती न समजणाऱ्या गोष्टी आहेत. पवार जे बोलतात ते कधी करत नाहीत. जे करतात ते कधी बोलत नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील त्यांचा हा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल काय समजावे अजून काही सांगता येत नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे.


Atul Chordia : ‘शरद पवार ते डोनाल्ड ट्रम्प’ यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून असलेले उद्योगपती

बच्चू कडू म्हणाले, एकंदरीत चित्र बघितल्यास राष्ट्रवादी पक्षच पूर्ण संभ्रमात आहे. अजित पवार गट हा शरद पवार यांचा फोटो वापरत आहे. त्यांच्याबाबत सगळ्या गोष्टी बघितल्यास संभ्रम निर्माण होत आहे. ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था आहे. अजित पवारांसोबत शरद पवार एकत्र येऊन महायुती अजून मजबूत करतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

Genelia Deshmukh: ‘प्रिय पप्पा…’, सासरे विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीयाची भावुक पोस्ट!

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद पवारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने शरद पवार यांना कृषी मंत्रिपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. ही ऑफर अजित पवार यांच्या मार्फत देण्यात आली होती. पण शरद पवारांनी ही ऑफर नाकारली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांचे हे विधान केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube