Atul Chordia : ‘शरद पवार ते डोनाल्ड ट्रम्प’ यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून असलेले उद्योगपती

Atul Chordia : ‘शरद पवार ते डोनाल्ड ट्रम्प’ यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून असलेले उद्योगपती

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यातील त्यांची ही जवळपास चौथी भेट ठरली. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या अलिशान निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय? शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालंल आहे असे सवाल महाविकास आघाडीमधूनच विचारले जात आहेत. एका बाजूला ही भेट चर्चेत आली असतानाच भेट ज्यांच्या घरी झाली ते अतुल चोरडिया देखील या निमित्ताने चर्चेत आले आहेत. (Who is Atul Chordia who made Sharad Pawar and Ajit Pawar meet)

कोण आहेत अतुल चोरडिया?

अतुल चोरडिया हे पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. सुरुवातील त्यांचा भवानी पेठेत साखरेचा व्यापार होता. त्यानंतर 90 च्या दशकात अतुल चोरडिया यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला आणि पंचशील रिअॅलिटीच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठे नाव कमावले. आज पुण्यातील खराडी, हिंजवडी, बाणेर या भागातील अनेक उंच इमारती, व्यावसायिक इमारती बांधण्याचे श्रेय पंचशील रिअॅलिटीला जाते. पुण्यातील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलचे मालक अशीही त्यांची ओळख आहे. जवळपास 5 हजार कोटींच्या संपत्तीचे ते मालक आहेत.

भावाला ईडीची नोटीस, 6 निकटवर्तीय रडारवर; जयंत पाटीलही सोडणार साथ? शरद पवारांचा मोठा दावा

चोरडिया आणि पवार यांचेही गेल्या दोन पिढ्यांपासून अतिशय घनिष्ठ आणि कौटुंबिक संबंध आहेत. अगदी पवारांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना ओळखून आहेत. पवार जेव्हा पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये (BMCC) शिकत होते. तेव्हा अतुल चोरडिया यांचे वडील ईश्वरदास चोरडिया आणि व्यापारी विठ्ठलशेट मनियार त्यांचे वर्गमित्र होते. आजच्या घडीला चोरडिया आणि मनियार ही दोन्ही नाव पुण्यातील बडी आसामी म्हणून ओळखले जातात.

पवारांची कन्या आणि बारामती खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांचे पंचशील रियालिटीच्या टेक पार्क वनमध्ये शेअर्स असल्याचे एकदा स्वतः चोरडिया यांनी सांगितले होते. ही माहिती सुळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्येही दिली असल्याची त्यांनी म्हंटले होते. यावरुनच आपल्याला पवार आणि चोरडिया कुटुंबियांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे आपल्याला दिसून येते. याशिवाय भाजपच्याही नेत्यांशी ते जवळचे संबंध राखून आहेत.

पंचशील ग्रुपचे अनेक लँडमार्क ठरणारे प्रोजेक्ट :

पंचशीलच्या माध्यमातून चोरडिया यांनी 2002 साली प्रसिद्ध इंटरनॅशलन कन्व्हेंन्शन सेंटर उभारले होते. हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर ठरले. याशिवाय 2003 साली IBM या आयटी क्षेत्रातील कंपनीसाठी पुण्यात मोठे टेक पार्कही उभारले आहे.

पंचशील रियालिटीला 2004 मध्ये मेरिल लिंचकडून थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली आणि 2005 मध्ये पंचशीलने ओकवुड रेसिडेन्स हे पुण्याचे पहिले आंतरराष्ट्रीय-ब्रँडेड सर्व्हिस असलेला रहिवासी टॉवर उभा केला. पंचशीलने 2006 मध्ये EON फ्री झोन, भारतातील पहिला IT आणि IT SEZ लाँच केला, ज्यामुळे नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या. 2008 मध्ये पंचशीलने कोर्टयार्डच्या बांधणीसाठी मॅरियट इंटरनॅशनलसोबत भागीदारी केली. ही पुण्यातील मॅरियट पहिली मालमत्ता ठरली होती. त्यानंतर 2010 मध्ये पुण्यातच जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेल आणि पुण्यातील एकमेव जागतिक व्यापार केंद्र पंचशीलने विकसित केले.

भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भागीदारीत भारतातील पहिले आणि एकमेव ट्रम्प टॉवर बांधण्याचे काम अतुल चोरडिया यांनी केलं आहे. 2014 मध्ये मुंबईच्या एक्सप्रेस टॉवर्सचे अधिग्रहण केल्यानंतर, पंचशीलने 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारसोबत मुंबई आणि पुण्यामध्ये चार आयटी पार्क विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला. पंचशीलने बीकेसीमधील फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही ताब्यात घेतले. एकूणच काय तर पंचशीलच्या माध्यमातून चोरडिया यांनी अनेक मोठं-मोठे प्रकल्प उभारण्याचे काम केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube