CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यासाठी सध्या श्रीकांत यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन केलं जात आहे. त्यात शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने. डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह या ठिकाणी पीपीपी तत्वावर विकसित केल्या जाणाऱ्या मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासह विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा रविवारी (३ मार्च) संपन्न झाला.
Manoj Jarange : ‘मला केव्हाही अटक होऊ शकते’; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर करण्यासाठी शासन, प्रशासन आणि महापालिका विविध योजनांच्या माध्यमातून अनेकविध प्रयत्न करत असून आगामी काळात नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. बाई रुक्मिणी रुग्णालय येथील पॅथॉलॉजी व रेडिओलॉजी सेंटरचे लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. इथे गरजूंना व रूग्णांना सीटी स्कॅन व एक्स रे ची सोय पीपीपीच्या माध्यमातून क्रस्ना डायग्नोस्टिक कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
याबरोबरच डोंबिवली येथे नव्या फिश मार्केटचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच शास्त्रीनगर येथे नवे शवविच्छेदन केंद्र, सुनीलनगर येथील अभ्यासिकेचे उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
भाजपच्या विजयात लालू ठरणार गेम चेंजर; ‘मै भी चौकीदार’ नंतर ‘मोदी का परिवार’ वाचवणार
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील ,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार प्रमोद पाटील, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदू जाखड, महापालिका सचिव वंदना गुळवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, क्रस्ना डायग्नोस्टिकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, आपुलकी हेल्थकेअरचे संचालक किंजल बाबरीया आदी मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह या ठिकाणी पीपीपी तत्वावर विकसित केल्या जाणाऱ्या मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासह विविध उपक्रमांचा लोकार्पण