Download App

NEET Exam तील गैरप्रकारावर समिती गठीत; विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्यांकन होणार

NEET Exam स्पर्धा परीक्षा वादात सापडत असतानाच आता मुलांना डॉक्टर बनवणारी प्रवेश परीक्षा नीट परिक्षा देखील वादात सापडली आहे.

Committee for Revaluation of Incremental Marks of NEET Exam : आरोग्य भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती… महाराष्ट्रासह देशभरातील स्पर्धा परीक्षा वादात सापडत असतानाच आता मुलांना डॉक्टर बनवणारी प्रवेश परीक्षा नीट परिक्षा ( NEET Exam) देखील वादात सापडली आहे. या परिक्षेत काही उमेदवारांना भरपाई म्हणून ग्रेस मार्क (Incremental Marks ) देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा अनेकांना 720, 719, 718 असे गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परीक्षेशी संबंघित तज्ज्ञ मंडळींच्या मते, NEET परीक्षेत 719 आणि 718 गुण मिळणे अशक्य आहे.

राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच! पुढील 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

त्यानंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) काही विद्यार्थ्यांना दिलेल्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव (ग्रेस) गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

PM Modi यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंट सुरू; पंतप्रधानपदाच्या हॅट्रीकसाठी मोदी सज्ज

‘नीट’ परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी. अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली होती. राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आरोपानंतर शनिवारी केंद्रीय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्याकंन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती ‘एनटीए’चे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी दिली.

या आरोपांनंतर आणि वादानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, तर काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्या याचिकांवर जुलैमध्ये सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

follow us

वेब स्टोरीज