मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या स्क्रीनसाठी समिती, प्राईम टाईम अधिकचे शोसह टिकीट दरावर निर्णय होणार
Committee to screen Marathi films मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Committee to screen Marathi films in multiplexes, shows reserved for prime time and more for 180 days, ticket prices to be decided : मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शासनाकडून मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांच्या शोध साठी स्क्रीन मिळावी यावर काम करणारी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.मराठी चित्रपटांना प्राईम टाईम अधिकचे शो 122 दिवसांवरून 180 दिवस राखीव, टिकीटचे दर, या विषयावर समिती चर्चा करून निर्णय घेईल.
ट्रोलिंग थांबवा.. माझी नाहक बदनामी; नवले कार अपघात प्रकरणात गौतमी पाटील ढसाढसा रडली
दरम्यान याबाबत ऑगस्ट महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती त्यामध्ये मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या कमी स्क्रीन्स तसेच त्यांना कोणतीही माहिती न देता दोन-तीन दिवसात चित्रपट थेटर मधून उतरवला जाणे आठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणे तसेच सेंसर बोर्ड कडून मराठी सिनेमांना सेंसर संमती आणि शोच्या वेळा ऐनवेळी बदलणे अथवा रद्द करण्यासाठी अनेक प्रश्नांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली यावेळी मराठी सिनेमांची निर्माते वितरक आणि विविध पक्षांचे सिने कर्मचारी संघटना देखील उपस्थित होते.
दि. बा. पाटील कोण ? नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देण्याची मागणी का? जाणून घ्या सविस्तर…
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी शासनाला पत्र लिहीलं होतं. प्रसाद ओक यांनी पत्रात म्हटलंय की, माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य. मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट निर्माण होत आहेत. पण प्रत्येक चित्रपटाला मोठ्या निर्मात्याचं किंवा मोठ्या स्टुडिओचं पाठबळ मिळतंच, असं (Entertainment News) नाही. अशा वेळेला त्या चित्रपटांना गरज असते, ती चांगल्या थिएटरमध्ये प्राईम टाईम शोची. असे शो जर या चित्रपटांना मिळाले, तर त्यांचा फायदा होवू शकतो. आर्थिक नफा होवू शकतो. आर्थिक नुकसानीपासून असे चित्रपट निर्माते वाचू शकतात. या विषयावर वारंवार बोलणं झालं…तक्रारी झाल्या. पण यावर अजूनही ठोस असा उपाय निघाल्याचं दिसत नाही.