मराठी चित्रपटांना ‘इफ्फी’ महोत्सवात सहभागी होण्याची संधी! महामंडळाकडून प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

मराठी चित्रपटांना ‘इफ्फी’ महोत्सवात सहभागी होण्याची संधी! महामंडळाकडून प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

Marathi films get a chance to participate in ‘IFFI’ festival! The corporation appeals for entries : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने दरवर्षीप्रमाणे गोव्यात होणाऱ्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बाजार’ अंतर्गत मराठी चित्रपटांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.

नानाने मागितली 45 वर्षापूर्वीची उधारी, जब्बार पाटेल म्हणाले थापा मारतो, पप्पा सांगा कुणाचे मंचावर काय घडलं?

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत मराठी चित्रपटांना स्थान मिळावे, देशोदेशीच्या चित्रपटकर्मींबरोबर संवाद वाढवण्याच्या हेतूने दरवर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी दिली जाते.

…तर ‘हू किल्ड करकरे’ पुस्तक भेट दिलं असतं; मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेचा मोर्चा, सपकाळांनी खडसावलं

‘फिल्म बाजार’च्या निवड प्रक्रियेसाठी दिनांक ०१.०८.२०२४ ते ३१.०७.२०२५ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त केलेले मराठी चित्रपट पात्र ठरणार आहेत. या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.filmcitymumbai.org उपलब्ध आहे. पात्र निर्माते व निर्मिती संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष किंवा gfffm2025@gmail.com या ई-मेलद्वारे दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube