Congreass MP Varsha Gaikwad on Devedndra Fadanvis for MMRDA : फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून कॉंग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा अशीमागणी केली आहे.
साहित्य संमेलनातील ‘ते’ वक्तव्य भोवलं, ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंना अब्रुनुकसानीची नोटीस
यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खुशखबर! सरकारी कर्मचारी मालामाल होणार; DA थेट 53 टक्क्यांवर, ‘या’ 7 महिन्यांचा सुद्धा पगार मिळणार
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई मेट्रो प्रकल्पांची रचना आणि देखरेख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिस्ट्रा या फेंच्र कंपनीने, प्रकल्पाचा खर्च वाढवण्यासाठी एमएमआरडीने दबाव आणल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार धक्कादायक असून भ्रष्टाचाराचे हे प्रकरण फ्रेंच दूतावासापर्यंत पोहोचले आहे. याचा थेट फटका जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईच्या विश्वासार्हतेला बसला आहे.
MG Hector वर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भ्रष्टाचाराची दखल घेऊन यातील जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. ही चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करावी. मुंबईवर भ्रष्टाचाराचा डाग लावणाऱ्यांना कठोर शिक्षा नाही झाल्यास मुंबईचा आणि मुंबईकरांचा विश्वासघात होईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा, आणि भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही या भाजपाच्या घोषणा इतर घोषणांसारख्या चुनावी जुमलाच ठरलेल्या आहेत. मोदानीच्या भ्रष्टाचाराचा फुगा अमेरिकेत फुटला आहे, त्यांच्यावर कारावाईची टांगती तलवार आहे. आता फ्रेंच कंपनीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने जगात भारताच्या नावाची बदनामी होत आहे. भाजपा युती सरकारने भ्रष्टाचार करुन मलई खाण्याचे काम केले आहे. फ्रेंच कंपनीने केलेल्या लाचखोरी व भ्रष्टाचाराच्या आरोपाने मुंबई व महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.