Download App

बाळासाहेबांच्या जयंतीचा काँग्रेसला विसर, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Balasaheb Thackeray jayanti : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडीत असलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसने श्रद्धांजलीचा स पण टाकला नाही. अजून किती अपमान वडिलांचा सहन करणार? असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawala) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे.

ते पुढं म्हणाले की आता 4.30 वाजले आहेत. अजूनही राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने बाळासाहेबांबद्दल एक ट्वीट देखील केलं नाही. त्यांचे अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, काँग्रेस किंवा राहुल गांधींच्या ट्वीटर हॅन्डलवरुन दुसरे अनेक ट्वीट झाले पण बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजलीचं एकही ट्वीट नाही. यामुळेच आम्ही म्हणतो उद्धव ठाकरेंनी यूटर्न घेतला आणि राजकीय धर्मांतरण झालं, अशी टीका शहजाद पूनावाला यांनी केली आहे.

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं

यावरुनच काँग्रेस पार्टी बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय विचार करते हे दिसून येतं. प्रत्येकवर्षी काँग्रेस आणि त्यांचे युवराज राहुल गांधी एकही ट्वीट करत नाहीत. पण उद्धव ठाकरे दरवर्षी इंदिरा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतात. अशाप्रकारचा अपमान तुम्ही किती दिवस सहन करणार, असा सवाल शाहजाद पुनावाल यांनी केला आहे.

काँग्रेसने वीर सावरकरांचा अपमान केला. त्यांना शिव्या घातल्या, हिंदुत्वाला शिव्या दिल्या, राम मंदिराला विरोध केला, ह्या लोकांना पुन्हा बाबरी उभा करायची होती. आज ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे. यावरुन उद्धव ठाकरेंची कोणती मजबुरी आहे की वडिलांचा अपमान सहन करत आहेत. कमीतकमी आता तरी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी अपमान सहन करु नका, असे शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.

follow us