Download App

मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार

Image Credit: Letsupp

Mumbai Congress : पुढील काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अशातच आता मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलं आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व इथले आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेसला धक्काचं बसल्याचं दिसून येत आहे.

अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच नाही पडलं; जयंत पाटलांची खोचक टीका

राज्यातील काँग्रेस नेत्यांपैकी बाबा सिद्धीकी हे काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांमधील एक नेते आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरु असल्याचं ऐकायला मिळत होतं. मुंबई काँग्रेसच्या नेते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात होतं. झिशान सिद्धीकी लवकरच आपला राजीनामा काँग्रेच्या हाय कमांड नेत्यांकडे देणार असून येत्या 10 फेब्रुवारीला होणाऱ्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात ते अजित पवार गटात सामिल होणार आहेत.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते काँग्रेसला रामराम करत असल्याचं दिसून येत आहे. नूकताच काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर आता झिशान सिद्धीकी यांच्या रुपात काँग्रेसला हा दुसरा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समुदाय आहे. सिद्धीकी यांना मोठ्या प्रमाणात माननारा वर्गदेखील आहे. झिशान यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवार गटाची मुंबईत ताकद वाढणार आहे.

Heeramandi First Look: संजय लीला भन्साळींनी शेअर केला ‘हीरामंडी’ची पहिली झलक

बाबा सिद्धीकी यांच्याविषयी…
झियाउद्दीन बाबा सिद्धीकी असं त्यांचं पूर्ण नाव असून ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे मतदारसंघातून निवडून आले आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा, राज्याचे कामगार मंत्री आदी विभाग चोख सांभाळलेही आहेत. 1992 आणि 1997 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर आहेत.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?
झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

follow us

वेब स्टोरीज