Download App

सीबीआयच्या छाप्यानंतर कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

Customs officer suicide : सीबीआयने (CBI) काल नवी मुंबईतील कस्टम अधीक्षक मयंक सिंग यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी कस्टमचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांनी आत्महत्या (Customs officer suicide) केली आहे. मयंक सिंगने छाप्याच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याने तळोजा येथील तलावात (Taloja Lake) उडी घेऊन आत्महत्या केल्याचे माहिती मिळाली आहे. सीबीआयने मयंक सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

छाप्याच्या दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याची आत्महत्या
मयंक सिंगवर आरोप होता की, मयंकने लाच घेऊन सीमाशुल्क विभागात प्रलंबित असलेली दोन बिले मंजूर केली होती. या आत्महत्येप्रकरणी खारघर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्याने लिहिले आहे की, सीबीआयने आपल्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आपल्याला लाज वाटत होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली.

शिक्षिकेच्या सांगण्यावरून एका मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; गुन्हा दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल केला
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. आम्हाला सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही या प्रकरणी एडीआर नोंदवला असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

Tags

follow us