शिक्षिकेच्या सांगण्यावरून एका मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; गुन्हा दाखल

शिक्षिकेच्या सांगण्यावरून एका मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; गुन्हा दाखल

Muzaffarnagar video : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाचचा पाढा न आल्याने एका मुलाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शिक्षिका वर्गातील एका मुलाला इतर मुलांकडून चापट मारायला लावत होती. यावेळी शिक्षिकेने वर्गात धार्मिक टिपण्णी केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरमध्ये विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 323, 504 अन्वये कारवाई केली आहे.

Sunil Tatkare : राष्ट्रवादीत फूट पडली का ? खासदार सुनील तटकरेंचे थेट उत्तर…

या प्रकरणाबाबत विद्यार्थ्याने सांगितले की, मला पाचचा पाढा आठवत नव्हता त्यामुळे मॅडमने वर्गातील मुलांकडून मारले. मॅडम मुलांना समोर बोलावून जोरात मारायला सांगत होत्या. मुलं तासभर मारत होत्या. असे मुलाने सांगितले.

मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी पैसेच नाहीत! मराठवाड्यातील भाजप आमदाराने परत केले म्हाडाचे घर

वास्तविक, हे प्रकरण मुझफ्फरनगरमधील खुब्बापूर गावात घडले आहे. तृप्ता त्यागी नावाच्या शिक्षिकेने युकेजीच्या एका मुलाला पाचचा पाढा म्हणायला लावला. त्यावेळी त्या विद्यार्थ्याला पाढा न आल्याने शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांना एका मुलाच्या कानशिलात मारण्यास सांगितले. त्यानंतर वर्गातील एकेक विद्यार्थी उठून त्या विद्यार्थ्याला मारहाण करत होते. त्यावेळी शिक्षिका पुन्हा कानशइलात मारून गेलेल्या विद्यार्थ्याला आणखी जोरात मारायला सांगत होती. यानंतर तिने आक्षेपार्ह शेरेबाजी केली. याप्रकरणी मन्सूरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube