Download App

कबुतरखान्यावर पुन्हा ताडपत्री! जैन समाज आक्रमक, मराठी एकीकरण समितीकडून आंदोलनाचा इशारा

Dadar Kabutarkhana Marathi Ekikaran Samiti Will Protest : मुंबईतील (Mumbai) दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutarhana) बंदीवरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 30 जुलै 2025 रोजी कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी घालण्याचा (Marathi Ekikaran Samiti) आदेश दिला होता, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट (Jain Community) केले. या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) दादर कबुतरखान्याला ताडपत्री आणि बांबूच्या संरचनेने बंद केले होते .

कबुतरांना अन्न देण्याचा प्रयत्न

6 ऑगस्ट रोजी जैन समाजाच्या काही सदस्यांनी या बंदीला विरोध करत कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली आणि कबुतरांना अन्न देण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला. या घटनेनंतर, महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलनात बाहेरील लोकांचा हस्तक्षेप असल्याचा दावा केला आणि प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश दिले.

आम्ही बुडालो, तर अर्धे जग सोबत घेवून जावू! अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला दिली अणुहल्ल्याची धमकी

जैन समुदायाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समितीने प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. कबुतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. यासाठी बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.

उपोषण सुरू करण्याचा इशारा

मुंबई महापालिकेने दादर कबुतरखान्यावर पुन्हा ताडपत्री टाकल्याने जैन समाजात नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य आक्रमक प्रतिक्रिया टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीमुळे वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जैन समाजाच्या काही सदस्यांनी या बंदीला विरोध करत 13 ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर बंदी उठवली नाही, तर ते उपोषण करतील.

अमेरिका राष्ट्रपती ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय त्यांच्याच अंगलट; नागरिकांना बसतायेत महागाईच्या झळा

मुंबई उच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी आपल्या पूर्वीच्या आदेशाला कायम ठेवले आणि कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी कायम ठेवली. न्यायालयाने स्पष्ट केले की, नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि या आदेशाचा कोणताही उल्लंघन केला, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे धार्मिक भावना, सार्वजनिक आरोग्य आणि कायद्याच्या अंमलबजावणी यामध्ये संतुलन साधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पुढील सुनावणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

follow us