Download App

आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम, कोण निवडून येईल, अन् कोण सत्तेत बसेल…; फडणवीसांची फटकेबाजी

आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल, कोण सरकारमध्ये बसेल आणि अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल, हे सांगता येत नाही - फडणवीस

Devendra Fadnavis : आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल, कोण सरकारमध्ये बसेल आणि अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल, हे सांगता येत नाही, अशी राजकीय फटकेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ते विधानभवनात टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार करतांना बोलत होते.

अबब! मुंबईतल्या ओपन बस परेडवर क्रिकेट आइसलँडचे मजेदार ट्विट म्हटले ही संख्या तर आपल्या… 

टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मुंबईतील चार खेळाडूंचा (Cricket ) आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल, कोण सरकारमध्ये बसेल आणि अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही आम्ही एकत्र आहोत. कारण, आपला भारत जिंकला, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्यात.

मुंबईतल्या विजयी रॅलीदरम्यान वेगळचं टेन्शन होतं; खचाखच भरलेल्या सभागृहात फडणवीसांचा खुलासा 

पुढं बोलतांना ते म्हणाले, भारतीय संघाच्या स्वागतासाठी काल मुंबईत मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो. कारण, एका वेळी इतके लोक एकत्र येणं सोपं नसते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईत एक लाख लोक बसू शकतील अशा मोठ्या स्टेडियमची गरज आहे. त्यासाठी येत्या काळात बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोशिएशला जी काही मदत लागेल, ती मदत सरकार करेल, असं फडणवीस म्हणाले.

सुर्यकुमारने केलं पोलिसांचं कौतुक
तर यावेळी बोलतांना सुर्यकुमार यादवने आपलं मनोगत व्यक्त केलं. यादव म्हणाला की, इथं बसलेल्या सर्वांना भेटून चांगल वाटलं. हा प्रसंगही मी कधीच विसरू शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाही, असं म्हणत त्याने मुंबई पोलिसांचंही कौतुक केल.

follow us

वेब स्टोरीज