Download App

सैफवरील चाकू हल्ल्याप्रकरणी CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘हल्ल्याचे बरेच धागेदोरे पोलिसांकडे, लवकरच….’

सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानव (Saif Ali Khan) गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती सध्या चांगली असून दोन ते तीन दिवसांनी डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता सैफ अली खान प्रकरणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नाराज भुजबळ देणार अजितदादांना धक्का, भाजप भुजबळांना राज्यसभेवर घेणार? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. पोलिसांचा तपास योग्यरित्या सुरू आहे. ते संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील, असं फडणवीस म्हणाले.

मस्साजोगचा खटला उज्जवल निकम लढणार? CM फडणवीसांनी सांगितली ‘ही’ अडचण… 

बीड प्रकरणातील दोषींना सोडणार नाही…
बीड हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बीड प्रकरणात होणारे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. तपास यंत्रणा सगळ्याच गोष्टी रोज बाहेर सांगू शकत नाही. अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांवर कोणताही दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे. बीड प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

उज्जवल निकम यांच्या नियुक्तीबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकीलाची नियुक्ती करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. तशी त्यांना विनंतीही केली. ते सकारात्मक निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. पण, मला नियुक्त केल्यानंतर काही लोक राजकारण करतात, राजकीय रंग देतात. हे मला योग्य वाटत नाही, असं निकम यांनी मला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे हे कुठंतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखेच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करण्याच्या प्रयत्नातून ही घटना घडली.

follow us