MLA Varsha Gaikwad On Gautam Adani : काँग्रेस नेत्या व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत धारावी प्रकल्पाबाबत मोठे खुलासे केले आहे. त्यांनी या प्रकरणात भ्रष्टचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी व राज्य सरकारवर आरोप केले आहे. धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर अदानींना नियम डावलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वर्षा गायकवाड यांनी काय आरोप केले?
धारवीची टेंडर प्रोसेस २०१८ साली झाली. त्यावेळी ७ हजार २०० कोटींचे टेंडर निघाले. यामध्ये १९ बिल्डरांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर असे सांगण्यात आलं की रेल्वेची जमीन नाही आहे. त्यामुळे हे टेंडर रद्द करा व नव्याने टेंडर काढा असे सांगण्यात आले. त्यानंतर 1/10/2022 रोजी पुन्हा नवीन टेंडर निघाले. हे टेंडर गौतम अदनी यांना देण्यात आले. ५ हजार ६९ कोटी रुपयांचे हे टेंडर काढण्यात आले.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
पहिल्यांदा असे पहायला मिळाले की, मागच्या टेंडरपेक्षा नवीन टेंडर हे कमी किंमतीचे आले. २ हजार १३२ कोटी रुपयांनी हे टेंडर कमी आले. जुन्या टेंडरच्यावेळी ८०० कोटी ते देणार होते. पण यावेळेस मात्र, हे ८०० कोटी सरकारने भरले आहे. हे टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यासाठी नियम बदलण्यात आले. कामाचा अनुभव कमी करण्यात आला. या प्रकल्पासाठी पहिले टेंडर हे ५ हजार ६९ कोटी रुपयांना आले, दुसरे टेंडर हे त्याच्या निम्म्या किंमतीत आले व तिसरे टेंडर तांत्रिकदृष्ट्या रद्द ठरले. त्यामुळे ज्याला टेंडर द्यायचे होते त्यालाच दिले गेले.
Modani's 'kabza-raaj' during 'Mitrkaal' knows no bounds.
After ports, airports, roads, coal and defence procurement, here's how this 'Mitr centric' government is going out of its way to hand over control of country's costliest real estate- Mumbai's real estate market- to PM's… pic.twitter.com/c4ZroAXmWB
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 27, 2023
यानंतर त्यांच्यासाठी नवीन टीडीआर घोटाळा तयार करण्यात आला. धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे. इथे टीडीआर लागू होत नाही. इथे टीडीआरचे कोणतेही अनुदेय नाही. याठिकाणी एफएसआयचा इन्सेनटिव देण्यात आलेला आहे. इथे टीडीआर लोडदेखील करता येत नाही. अशा वेळेला बाजार भावाच्या ५० टक्क्यांनी टीडीआर लोड करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुंबईच्या सगळ्या विकासकांनी ४० टक्के टीडीआर हा अदानींकडून घ्यावा असा निर्णय झाल्याची माहिती आहे. जेव्हा की हे सगळे टीडीआर धारावी स्लम डेव्हलेपमेंटमधून आले असून त्याला आता जनरल टीडीआरमध्ये धरण्यात आले आहे.
‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात
दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या आरोपांवर अद्याप राज्य सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. गौतम अदानींविरोधात वर्षा गायकवाड इतर आमदारांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी मोदानी हटाव, धारावी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.