Eknath Khadse Health : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रकृती आणि डेंग्युबद्दल माहिती देत राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते व आमदार एकनाथ खडसेंनीही (Eknath Khadse) आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देत नागरिकांना दिवाळाच्या शुभेच्छा दिल्या. चार दिवसांपूर्वी खडसेंना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची बातमी समोर आली आहे.
Maratha Reservation : पत्रकारांची प्रश्नांची सरबत्ती; चिडलेल्या सावंतांचा ‘मविआ’वर घणाघात
खुद्द खडसेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. खडसेंनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. सध्या आपली प्रकृती ठणठणीत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी पेपर वाचतानाचा आपला एक फोटोही शेअर केली. यात त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं दिसतं.
खडसेंनी लिहिलं की, मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र, आपल्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळं माझी प्रकृती आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन आपल्या सेवेत रूजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा, अशा आशयाची पोस्ट खडसेंनी लिहीली.
राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा
4 दिवसांपूर्वी खडसे यांच्या छातीत दुखत होते. यानंतर त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी खडसेंच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यासं समोर आलं. यानंतर त्यांना रविवारी रात्री त्यांना हवाई अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच पुन्हा सेवेत रुजू होईल, असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला.
दरम्यान, सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदिकिनी खडसेही उपस्थित होत्या. शरद पवार यांनी खडसे यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी खडसेंनीही त्यांच्याशी बातचीत केली होती. या भेटीचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ट्विटरवर शेअर केला होता.