Download App

Eknath Shinde : ‘फक्त बोलघेवडेपणा करून धूळफेक करता येत नाही’; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde vs Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दावोसला रवाना होण्याआधी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले.

शिंदे म्हणाले, उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असे दहा लोकांचे शिष्टमंडळ दौऱ्यावर जात आहे. एमएमआरडीए आणि महाप्रीन असे आठ लोक आहेत त्यांनाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांच्यासारखे (आदित्य ठाकरे) आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाहीत. ते काय बोलतात यावर मी काही बोलण्याची गरज नाही. फक्त बोलघेवडेपणा करून राज्याच्या जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करू त्यांची निश्चित अंमलबजावणी होईल, असे शिंदे म्हणाले.

दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची वादात उडी

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप करत पुन्हा 50 खोकांवरही डिवचले आहे. आधी ५० खोके होते. आता 50 लोक घेऊन मुख्यमंत्री दावोसला जात आहे. त्यात एका खासदाराचा समावेश आहे. एका माजी खासदाराचा समावेश आहे. आता गद्दारी करणाऱ्यांना सोबत नेत आहेत. काही दलालही सोबत नेण्यात येत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला होता.

follow us

वेब स्टोरीज