Download App

एकनाथ शिंदे घेणार महत्वाची बैठक; नाराजी अन् महायुतीतील धुसफूसीवर चर्चा होणार?

Eknath Shinde यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक "वरळी डोम" येथे आयोजित करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde Shivsena Meeting in Mumbai : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे अनेक शासकीय कार्यक्रमाला देखील उपस्थित नसतात मात्र ते नाराज नसल्याचं फडणवीसन कडून तसेच अजित पवारांकडून सांगितले जात. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नाराजीच्या चर्चांमध्ये शिंदे काय भूमिका घेतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीत पुन्हा धुसफूस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार शक्तिप्रदर्शन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता “वरळी डोम” येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील. शिवसेना सचिव, उपनेते, खासदार (आजी माजी), आमदार (आजी माजी), नगरसेवक, विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, उपविभागप्रमुख युवा सेना कार्यकारिणी सदस्य, युवा सेनेचे लोकसभेतील व विभाग स्तरावरील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला

दरम्यान राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) धुसफूस सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच वैद्यकीय गरजवंतांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष असताना देखील शिंदेंनी मोठा निर्णय घेत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरु केला आहे. त्यामुळे या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय पातळीवर शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्याकाही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभमेळाव्याला (Mahakumbh Mela) जाऊन पवित्र स्नान केलं आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे देखील आपले सर्व आमदार (MLA) आणि खासदारांसह (MP) महाकुंभात जाणार आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह शिंदे महाकुंभात जाणार असल्याने ते राष्ट्रीय पातळीवर मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून 57 आमदार आहे.

follow us