Download App

मुंबई जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले ! पदाधिकाऱ्यांना दिले मोठे टार्गेट

Eknath Shinde यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde ShivSena officials meeting in mumbai for BMC Election : शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. आज मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता “वरळी डोम” येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बराक ओबामा समलैंगिक अन् मिशेल ओबामा पुरुष; एलन मस्कच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

यावेळी मुंबई जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना मोठे टार्गेट दिले. शिंदे म्हणाले की, शिवसेनेचा डंका देशभरात वाजण्यासाठी काम करा. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वार्डामध्ये 123 लोकांची नावं नोंदवायची हे टार्गेट प्रत्येकाला दिला आहे.

21 जानेवारीची तारीख अन् 4 अधिकाऱ्यांची नावे; धसांनी टाईमलाईन देत धाकधूक वाढवली

या आकड्यामागे 23 जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने ठेवण्यात आले आहे. तर प्रत्येक वार्डामध्ये 5000 पेक्षा जास्त नाव नोंदणी करण्याचे टार्गेट ठेवा. कारण पक्ष मोठा केला तर तुम्ही मोठे व्हाल. त्यामुळे शिवसेना सदस्य नोंदणी आणि कार्यकर्ते वाढवा. ठाण्यामधून सुरुवात झालेल्या क्लस्टरच्या कामाला मुंबईमध्ये सर्वत्र पसरवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.

या बैठकीला शिवसेना नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. शिवसेना सचिव, उपनेते, खासदार (आजी माजी), आमदार (आजी माजी), नगरसेवक, विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, उपविभागप्रमुख युवा सेना कार्यकारिणी सदस्य, युवा सेनेचे लोकसभेतील व विभाग स्तरावरील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

follow us