21 जानेवारीची तारीख अन् 4 अधिकाऱ्यांची नावे; धसांनी टाईमलाईन देत धाकधूक वाढवली

Suresh Dhas on Beed Dhananajay munde agriculture department scam : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्याप्रकरणी परखड भूमिका घेतलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज या प्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना. धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये तथाकथित झालेल्या गैरव्यवहारांबाबत चार अधिकाऱ्यांची नावे घेऊन खळबळजनक दावा केला आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का
गेल्या सरकारमध्ये कृषिमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये तथाकथित झालेल्या गैरव्यवहारांबाबत बोलताना धस म्हणाले की, मी याबाबत कृषी आयुक्त तसेच रस्तोगी यांना पत्र दिलेले आहे. या घोटाळ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवण्यात आलं आहे. तसेच या अंतर्गत जे अधिकारी नेमण्यात आले. त्यांचे रेट कार्ड काय होते? त्यांच्याकडून किती पैसा घेऊन पद देण्यात आली? याचा सर्व खुलासा मी परवा करेल. कारण उद्या शिवजयंती आहे. यामध्ये जे अधिकारी ऐकत नाहीत. असे चार अधिकारी बदलले आहेत. त्यांचे नाव देखील मी परवा सांगेल. असं म्हणत धस यांनी धाकधूक वाढवली आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली, आता पुण्यात मोठी जबाबदारी
यावेळी त्यांनी एसआयटीची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी बीडमध्ये काही निवडक अधिकारीच गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत. असंही ते म्हणाले त्या अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी केली जावूी अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी संतोष देशमुखांना मारणाऱ्यांकडून त्यांची बदनामी करण्याचा कट केला जात होता. त्यासाठी कळंब येथे एक महिला तयार करण्यात आली होती. जिच्याशी झटापट करताना त्यांना मारण्यात आल्याचं दाखवण्यात येणार होतं. मात्र कळंबला जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा प्लॅन फिसकटला. असाही दावा धस यांनी केला.