महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का

  • Written By: Published:
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का

Gujarat Municipal Corporation Election : हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने (BJP) गुजरातमध्ये देखील काँग्रेसला (Congress) धक्का देत मोठा विजय नोंदवला आहे. गुजरातमध्ये नुकतंच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये (Gujarat Municipal Corporation Election) भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. माहितीनुसार, 66 नगरपालिकांमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यापैकी 57 नगरपालिकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेस या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे.

तर जिल्हा पंचायतीच्या सर्व 9 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच अहमदाबाद, भावनगर आणि सुरत महानगरपालिकेच्या तिन्ही जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजपने जुनागड महानगरपालिका, कठलाल, कापडवंज आणि गांधीनगर या तालुका पंचायती जिंकल्या आहेत. तर सलाया नगरपालिका ही एकमेव नगरपालिका आहे जिथे काँग्रेसची सत्ता असेल.

तालुका पंचायत पोटनिवडणुकीत भाजपने 73 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 12 जागा जिंकल्या, आपने 2 आणि अपक्ष उमेदवारांनी 1 जागा जिंकली. महानगरपालिकांमध्ये भाजपने 1,315 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 252 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनी 126 जागा जिंकल्या आहेत. तर, 11 जागा जिंकल्या आहेत, आपने 13 जागा जिंकल्या आहेत आणि इतरांनी 4 जागा जिंकल्या आहेत.

मोरबी जिल्ह्यातील वांकानेर आणि बोटाड येथे झालेल्या मध्यावधी निवडणुकीत भाजपने 62 जागा जिंकल्या, काँग्रेसने 8 जागा जिंकल्या, अपक्षांनी एकही जागा जिंकली नाही, आपने 1 जागा जिंकली, बसपाने 1 जागा जिंकली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube