बराक ओबामा समलैंगिक अन् मिशेल ओबामा पुरुष; एलन मस्कच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

बराक ओबामा समलैंगिक अन् मिशेल ओबामा पुरुष; एलन मस्कच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

Controversial Statement of Elon Mask father on Barack Obama : सध्या देश आणि राज्याच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील अनेक वादग्रस्त विधानांना उधाण आले आहे. ज्यामध्ये आता टेस्ला या कार कंपनीचे मालक एलन मस्क यांचे वडील एरोन मस्क यांनी देखील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

21 जानेवारीची तारीख अन् 4 अधिकाऱ्यांची नावे; धसांनी टाईमलाईन देत धाकधूक वाढवली

त्यांचे वडील म्हणाले की, बराक ओबामा समलैंगिक आहेत. तसेच त्यांनी ज्यांच्याशी लग्न केले आहे. त्या मिशेल ओबामा एक पुरुष आहेत. मात्र त्या महिलांसारखे कपडे घालतात. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर देशासह जगभरातून टीकेचा भडीमार सुरू आहे. मस्क यांचे वडील एरोन यांनी वाइड अवेक पॉडकास्ट या कार्यक्रमामध्ये जोशुआ रुबिन यांना एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबद्दल हे अश्लील विधान केलं आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का

त्यावेळी बोलताना एरोन म्हणाले की, बराक ओबामा हे समलैंगिक आहेत. त्याचबरोबर त्यांनी ज्या महिलेशी विवाह केलाय. त्या मिशेल ओबामा एक पुरुष असून त्या महिलांसारखे कपडे घालतात. हे सर्वांनाच माहिती आहे. यावर मुलाखतकार जोशुआ म्हणाले की, मिशेल ओबामा एक पुरुष आहेत का? तर त्यावर एरोल म्हणाले हो नक्की तुम्हाला हे माहित नाही का? तसेच पुढे ते म्हणाले की, ही माहिती सर्वांपासून लपवण्यात आली आहे. मात्र ही माहिती सुरुवातीपासूनच सार्वजनिक ठिकाणी देखील सर्वांना माहित आहे.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली, आता पुण्यात मोठी जबाबदारी

तसेच यावेळी एरोन यांनी आणखी एक दावा केला की, जॉन रिवर्स नावाचे कॉमेडियन ज्यांनी 2014 मध्ये मिशेल ओबामा यांच्या लिंगाबाबत चेष्टा केली होती. त्यावेळी ते देखील बराक ओबामा यांना समलैंगिक असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर लगेचच दोन आठवड्यांनीच रिवर्स यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतरच ओबामा दांपत्य हे समलैंगिक असल्याचं पुढे आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube