Download App

Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी नियमात बदल केला का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

Uddhav Thackeray : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचा निवडणुकीतील प्रचार आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर जोरदार टीका केली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे का? मोदी-शहांसाठी काही बदल केले आहेत का? या प्रश्नांचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावेत असेही ठाकरे म्हणाले. भाजपाच्या (BJP) निवडणुकीतील प्रचारावर (Election 2023) उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत काही प्रश्नांची उत्तरे मागितल्याचे सांगितले.

Uddhav Thackeray : ‘महागाई वाढणार, मग त्यात विशेष काय?’ उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल 

बाळासाहेबांना निवडणूक बंदी,  मतदानाचा अधिकारही काढला 

1987 मध्ये विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीत उभे राहण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता. मात्र आता पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा धर्माच्या आधारावर मतं मागत आहेत. तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. त्यांच्यासाठी नियम बदलले आहेत का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, देशात काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत. क्रिकेटमध्ये काही नियम असतात तशीच निवडणुकीत आचारसंहिता असते. शिवसेनेतर्फे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. काही शंकांवर खुलासा होणे गरजेचे आहे. आयोगाचं धोरण अनेकदा असं दिसतं की भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांनी फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणताच येणार नाहीत.

भाजप कपटी ते घराणेशाही; उद्धव ठाकरे कुणा-कुणावर कडाडले !

मोदी-शहांसाठी नियम बदलले का?

आचारसंहितेबाबत आयोगाकडून भाजपला फ्री हिट देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मध्य प्रदेशात राम मंदिराच्या मोफत दर्शनासाठी घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आयोगाने नियमावलीत काही बदल केले आहेत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

त्यांच्या गर्दीत मी कुठे जाऊ ?

राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना उद्घाटनला विषय लांबचा आहे. त्यांच्या सोयीनुसार, निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हे उद्घाटन करत आहेत. भाजप अनेक लोकांना बोलावणार आहे. त्यांचा पक्ष मोठा आहे ते गर्दी जमवू शकतात. त्यांच्या गर्दीत मी कुठे जाऊ, असा टोला ठाकरेंनी लगावला.

follow us