भाजप कपटी ते घराणेशाही; उद्धव ठाकरे कुणा-कुणावर कडाडले !
मुंबईः शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचा (BJP) जोरदार समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे घराणेशाहीवरून काही पक्षांवर निशाणा साधत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जोरदार सुनावले आहे.
प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !
ठाकरे म्हणाले; होय मी घराणेशाहीचा पाईक आहे. कुटुंबव्यवस्था मान्य करा आणि कुटुंबव्यवस्था हिंदू संस्कृतीचा पाया आहे. तुम्हाला आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही. घराणेशाहीला विरोध करा पण आम्ही मोठे केलेल्यांमध्ये बाप मंत्री, मुलगा खासदार आहे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होते. न्यायाधीशांचा मुलगा न्यायाधीश होतो ही काही घराणेशाहीची परंपरा आहे. काहींचे घराणीच माहिती नाही. हिटलर, पुतिन, मुसोलिनी यांची घराणे माहिती नाही. ज्यांचा आगापिछा नाही, त्यांचे वाईट उदाहरणे आहेत, हेही लक्षात ठेवा. आज बहुमत मिळाले आहे. 95 ते 98 टक्के हिटलरला बहुमत मिळाले होते. आता जर्मन लोकांना त्याची लाज वाटते. आता काही जण झोळी लावून निघून जातील. तुम्ही बसा कटोरा घेऊन, असाही टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आमच्याकडे बसलेत तीन हिरो, कमळा पसंतवाले; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
पण निघताना नवरा-बायकोत भांडणे लावतात
भाजप विघ्नसंतोषी आणि कपाटी आहे. ते पंगतीला जाणार, खाणार पण निघताना नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती , शिवसेना, जनता दल, अकाली दल या सर्वांची मैत्री करून भाजपने पक्ष फोडले. हे चुली पेटवत नाही पण घरे पेटवतात आणि त्यावर पोळी भाजतात. जरांगे पाटील अशा भाजपपासून सावध रहा, असे ठाकरे म्हणाले.
संजय राऊत हे सरकारच्या कारभारावर बोलले आहेत. आमच्या लोकांना त्रास देत आहात. उद्या आमचे सरकार आणणणार म्हणजे आणणार.
मग आले की मग कसे उलटे टांगणार बघा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. भाजप कावळ्याच्या विष्टेतून तयार झालेला पिंपळ आहे. त्याला मुंज्यासारखे पूजन केले जातेय. मुंबईची स्वायत्त काढून ती नीती आयोगाच्या नियंत्रणखाली आणली जाते आहे. माझ्या कोरोना काळाची चौकशी करता ना मग पीएम केअर फंडाची चौकशी करा. उत्तर प्रदेशमध्ये प्रेत तरंगत होती. गुजरातमध्ये हजारो प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरु होते, याची चौकशी कोण करणार, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.