Uddhav Thackeray : ‘महागाई वाढणार, मग त्यात विशेष काय?’ उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : देशभरात वाढलेल्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर ठाकरे गटाने मोदी सरकारला (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. भाजीपाल्यापासून धान्य कडधान्यापर्यंत, डाळींपासून खाद्यतेलापर्यंत जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे. याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली. महागाईकडे दुर्लक्ष करत उसने आवसान आणत जनतेने दिवाळी साजरी केली. मात्र, दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेचा अवसान घात केलाच. महागाई वाढणार असा इशारा दिला आणि आपले हात झटकले. सरकारी बँकांचे खासगीकरण असो की महागाईचे खापर, स्वतःची जबाबदारी झटकण्याचेच उद्योग केंद्रातील राज्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळेच महागाई वाढेल या नवीन इशाऱ्याबाबतही त्यात विशेष काय? असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाने सामनातून केली आहे.
Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेऊन आम्हाला भिडा’ उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान
दरवर्षीप्रमाणे यावर्षातही पाऊस झाला नाही. त्याचा फटका देशातील सामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. कमी झालेला पाऊस, लांबलेला मान्सून, अवकाळीचे तडाखे, कमी झालेली खरीप पेरणी, धरणांतील कमी पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. त्यातच दिवाळीचा सण संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा महागाईचे संकेत दिले त्याचा सामान्य जनतेला फटका बसणार आहे. मागील नऊ वर्षात हे भाजप सरकार सत्तेत होते. मात्र, युपीएच्या काळात याच भाजपकडून महंगाई डायन म्हणत जोरदार हल्लाबोल केला जात होता. मात्र, दिवाळीच्या सणात याच सरकारने महागाईचे संकेत दिले आहेत, अशी टीका या लेखात करण्यात आली आहे.
दिवाळीच्या उत्साहावर सरकारचे विरजण
बुधवारी भाऊबीज उत्साहात पार पडली आणि महागाई वाढणार असे सांगत सरकारने दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानेच महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे 0.52 टक्के होता. सलग सातव्या महिन्यात हा दर शू्न्याच्या खाली आला आहे. त्यात भाजीपाल्याच्या किंमतीतही चढ उतार, खाद्यपदार्थांची दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी यांमुळे नजीकच्या भविष्यात घाऊक महागाई वाढू शकते, असे नेहमीचे इशारे नगारे सरकारने वाजविले आहेत, असे या लेखात म्हटले आहे. आता दिवाळी संपताना महागाईचा बॉम्ब फोडण्याचा हा प्रकार योगायोग म्हणायचा की सरकारची चाल? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
Uddhav Thackeray : ‘अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की’.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला