Uddhav Thackeray : ‘अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की’.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray : ‘अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की’.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,अशा शब्दांत ठाकरे यांनी टीका केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आजारपणाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली.

Video : मुंब्य्रात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांच्या मदतीशिवाय…

यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवारांच्या आजारपणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, माझा अजितदादांशी कसलाही संपर्क आता राहिलेला नाही. त्यामुळं त्यांना नेमका कसला ताप आहे. सहकाऱ्यांचा ताप, मनस्ताप म्हणजे ताप आहे की मनस्ताप हे त्यांनाच माहित मला माहिती नाही.

पोलीस बाजूला ठेवा, व्हायचं ते होऊन जाऊ द्या

पोलिसांनी मुंब्रयात भाडोत्री गुंडांना प्रवेश द्यायला नको होता. त्यांना संरक्षण द्यायला नको होतं. ज्यांचं अकलेचं दिवाळं निघालं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील दिवाळी खराब होऊ नये म्हणून आम्ही संयम पाळला. पण, याचा अर्थ असा होत नाही की दरवेळी आमच्याकडून संयम आणि तुमच्याकडून यम असं होणार नाही. दरवेळी तुम्ही असं वागणार असाल तर आमच्या संयमातील ‘स’ गेल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा सांगतो पोलिसांना बाजूला ठेवा. जे व्हायचं ते होऊनच जाऊ द्या असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

शिवसेनेची शाखा जिथे होती तिथेच राहिल

डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात ठाण्यात आम्ही सभा घेणार आहोत. सत्तेच्या माजावर यांनी शाखा पाडली आणि आता घरं देखील पाडतील. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. आम्ही ठाण्यात आणि मुंब्र्यातही येऊन दाखवलं. सकाळी कुणीतरी ठाण्यात येण्याचं आव्हान दिलं होतं. आम्ही इथं आलो. गद्दारांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. आमच शाखा बुलडोझर लावून पाडली. पण आम्ही गप्प बसणार नाही. कारण ती आमची शाखा आहे. शिवसेना ही एकच आहे ती आमची आहे. त्यामुळं शिवसेनेची शाखा जिथे आहे तिथेच राहिल असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Uddhav Thackeray : ‘दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरंवटा’; ठाकरे गटाचा सरकारवर घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube